Background: The poem references to events from a serial 'Asambhav'. It is a monologue by this character, Prathamesh.
Prathamesh is a mute 10-year old boy who, as a child, got past-life visions. He was a cook in the same family in his last birth. He could not correlate them with the present. One day, he saw a lady - who had killed her in his past birth. He became violent. His parents could not understand why. He was tagged mentally unstable.
And a few days later, he saw a lady - who was trying hard to protect her in his last birth. He recognized her. He could now correlate the visions with his past. He uttered the name she bore in her previous birth - "Parvati".

(Dedicated to Asambhav lovers)
आई ग
लहान असताना झालेले ते भास,
डोळ्यांशीवाय दिसलेले ते सगळे,
ते लोक, त्या घटना,
सगळेच होते ते जगावेगळे...
वाडा आपलाच होता ग,
पण माणसे मात्र वेगळी होती...
ह्या माणसांना स्वतः पाहत असलेली,
चुलीच्या मागे बसलेली ती कोण होती...
तिच्या डोळ्यातून का दिसत होते मला आई ग,
समजायचेच नाही कधीही,
शेवटी एकदा दिसले बयोचे डोळे,
दिसलेले जे बर्याचदा आधीही...
नव्या वेषात, नव्या रूपात,
आज बयो माझ्या समोर उभी दिसली..
नव्या जनमातली ही बयो कुणास ठाऊक,
पूर्वीसारखीच भयाण वाटली...
समुद्राच्या लाटेसारखे, वाहणार्या वार्यासारखे
झर्रकन आठवला तो काळ,
माझी बयो, ते भुयार, ती मूर्ती
ती चेटकिन आणि ती मोहन माळ..
आग-आग झाली अंगाची पाहून तिला पुन्हा,
तुटून पडलो तिच्यावर तिथल्या तिथे,
पाण्यात घुसमटलेल्या त्या माझ्याच श्वासांची,
आणि माझ्ातल्या गोदाचि भेट झाली इथे..
तेव्हाही आई ग, तू नाही समजू शकलीस मला,
एकदा माझ्याबद्दल विश्वास का नाही ग आला..
इतरांनी मला वेडा ठरवला होता ग आई,
माझ्या जाणिवतील त्या कथेला कोणीच साक्षीदार का नाही..
भासांना चित्रातून रूप देत बसायचो मग मी,
मूकेपानाच्या शापाला कुरावाळात बसायचो मी...
दिसतात का पहायचो त्या काळातले सांगाती
चमकले डोळे एक दिवस, दिसली जेव्हा..पा..व..ती..